मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. पंकजा मुंडे यांना केंद्रात स्थान मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.पंकजा मुंडे यांचे हे पुनर्वसन असले तरीही विधानसभा-विधानपरिषदेला डावलले गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना महाराष्ट्र कार्यकारिणीत स्थान मिळेल अशी दाट शक्यता होती मात्र त्यांना देखील स्थान मिळालेले नाही.
भाजपच्या महामंत्री पदी चंद्रशेखर बावनकुळे असतील, तर एकूण 12 जण पक्षाच्या उपाध्यक्षपदी असतील. यामध्ये राम शिंदे, प्रीतम मुंडे, रक्षा खडसे आदींचा समावेश आहे.भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये असतील, आयटी विभागाचे प्रमुख आशिष कुलकर्णी असतील.
भाजपने घोषित केलेल्या या जम्बो कार्यकारणीत कार्यकारणी सदस्य 69 असतील. निमंत्रित सदस्य 139 जण असतील. सर्व आमदार-खासदार कायम सदस्य असतात. राज्याच्या सर्व सामाजिक स्तर आणि भौगोलिक क्षेत्रांना न्याय देण्यासाठी या कार्यकारणीचा उपयोग होईल.
नागपूरचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महामंत्री आहेत. आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, श्रीकांत भारती महामंत्री आहेत. विजय पुराणिक महामंत्री संघटक आहेत. नाराज असलेले एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं आहे.
विधानसभेत मुख्य प्रतोद हे आशिष शेलार, माधुरी मिसाळ असतील असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. भाजपची कार्यकारिणी महामंत्री – सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक
उपाध्यक्ष -माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकुर असे 12 उपाध्यक्ष असतील.
सेक्रेटरी – माजी आमदार प्रमोद जठार, , संजय पुराम, अॅड धर्मपाल मेश्राम, खासदार रक्षा खडसे, संदीप लेले, स्नेहलता कोल्हे, दयानंद चोरगे, इंद्रिस मुलतानी, अमित गोरखे, नागनाथ निरोवदे, राजेंद्र बकाने, अर्चना तेहटकर .
भाजपमध्ये धुसफूस : कवितेच्या दोन ओळी पोस्ट करत मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली नाराजी
माझं बरंवाईट झाल्यास रावसाहेब दानवे जबाबदार : हर्षवर्धन जाधव
राज्य दुहेरी संकटात असतानाही पवारांनी दोन माजी आमदारांचा करवून घेतला पक्षप्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

