नागपूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली असून ३ मार्च पर्यंत मलिकांना ईडी कोठडी सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी नवाब मलिक यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच राज्यभरात भाजप नेत्यानी आंदोलन देखील सुरू केले आहेत.
या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. तसेच नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा देखील त्यांनी दाखल केला आहे. यावेळी त्यांनी नवाब मलिकांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली.
महत्वाच्या बातम्या:
“मला दारूगोळा हवा, पळून…”; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेचा प्रस्ताव नाकारला
रशियाने संयुक्त राष्ट्रात सोडले ‘ब्रह्मास्त्र’ , जाणून घ्या वीटो पावरचे ‘युक्रेन कनेक्शन’
“यशोमती ठाकुरांनी मनोरुग्णांचे उपचार करून घ्यावे”, मोठी बहिण म्हणत नवनीत राणांचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

