🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक यांना ED (ईडी) करून अटक करण्यात आली. नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि केंद्रातील सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्ष यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
भारतीय जनता पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जो पक्ष किंवा माणूस जाईल त्याला त्रास दिला जात आहे असा आरोप करीत महराष्ट्रातील अनेक बड्या राजकीय नेत्यांनी नवाब मलिक यांच्या अटकेविरुद्ध आज आंदोलन केले. त्यातच आज भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना पुन्हा इशारा दिला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आपल्या भाषणात अनेक वेळा उत्तरभारतीय लोकांवर टीका करत असतात, मात्र पर्वाच ते शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांना घेऊन उत्तरप्रदेश निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी गेले होते. त्यामुळे संजय राऊत हे दूतोंडी आहेत अश्या शब्दात मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तसेच तुम्हाला अटक केल्यावर तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांना बदनाम करत असता आणि केंद्रीय तपास यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची पण यामुळे बदनामी होत असते.
मात्र तुम्ही जेव्हा वाईट काम करत असता तेव्हा तुमच्याबरोबर राज्यातील कोण कोण अधिकारी सामील असतात याची संपूर्ण यादी माझ्याकडे आहे आणि काही कालावधीतच मी एक-एक जणांची नाव बाहेर काढणार आहे. आता पुढील नाव एका मोठ्या IPS (भारतीय पोलिस सेवा) आधकाऱ्याचे असणार आहे असेही मोहित कंबोज यांनी आज सांगितले. त्यांनी ट्विट करत आज संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यावर टीका केली.
नवाब मलिक और संजय राउट केंद्रीय एजेंसियां और उनके अधिकारियों के नाम लेते है बदनाम करते है बिना सबूत के ,सलीम – जावेद को यह भूलना नहीं चाहिए हम किसी का नाम नहीं लेते लेकिन तुम्हारे इशारे पे काम करने वाले कुछ अधिकारियों के काले चिट्ठे सब हमारे पास हैं !
I Will Expose One IPS Soon!
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) February 26, 2022
महत्वाच्या बातम्या :
- “मराठी भाषेचा आग्रह धरा, पण…”, विनोद तावडेंचे मोठे वक्तव्य
- “यशोमती ठाकुरांनी मनोरुग्णांचे उपचार करून घ्यावे”, मोठी बहिण म्हणत नवनीत राणांचा सल्ला
- वर्ल्डकपसाठी आयसीसीची अजब योजना ; कोविडचा उद्रेक झाल्यास महिला संघ ९ खेळाडूंसह खेळेल
- “अशोक गावडेची जीभ छाटा”, अमृता फडणवीसांबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चित्रा वाघ संतापल्या
- ‘महाविकास आघाडी दाऊदचे समर्थन करत आहे’ – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
