Share

भाजपमध्ये धुसफूस : कवितेच्या दोन ओळी पोस्ट करत मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली नाराजी

Published On: 

पुणे : भाजपने वरिष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी भाजपकडून प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला माढा हा आपला बालेकिल्ला गमवावा लागला होता.

विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या तिघांनाही उमेदवारी देण्यास भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या नावाला लाल कंदील मिळाला. त्यामुळे त्यांचे राजकीय पूनर्वसन होणार की नाही याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

राजकारण करून लोकांच्या भावनांशी खेळून त्यांच्या जीवाचा खेळ मांडू नका – धनंजय मुंडे

विधानसभा निवडणुकीत बावनकुळे आणि खडसे यांचे तिकिट नाकारण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या विधानपरिषदेत त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा भाजप नेते व कार्यकर्त्यांना होती. विधानपरिषदेबाबात एकनाथ खडसे यांनी इच्छाही व्यक्त केली होती. पण, यंदाही त्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

बेवड्यांच्या ‘आता भाऊ गाडी चालवणार’ला गडकरी लावणार ब्रेक

भाजपची विधान परिषदेची उमेदवार यादी जाहीर झाल्यापासून पक्षातील नाराजांची संख्या वाढतच आहे. कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनीही विधानपरिषदेचे तिकीट मिळेल अशी आशा होती पण त्यांचा देखील पक्षाने पत्ता कट केला. यानंतर आता त्यांनी जाहीररित्या नाराजी बोलून दाखवली आहे. एका कवितेच्या ओळी सोशल मीडियावर शेअर करून त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी ‘आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल को हमने समझाया…’ अशा ओळी फेसबुकवर पोस्ट केल्या आहेत. आज पुन्हा एकदा मनाची समजूत घातली,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

शपथविधी सोहळ्याचे साधे निमंत्रणही न मिळालेल्या घटक पक्षांना आता महामंडळाची आशा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!