🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची चर्चा आहे. जळगाव जिल्ह्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे खंडणी आणि गुन्हेगारी धमकीचा जळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास आता सीबीआय करत आहे. दरम्यान या प्रकरणावरून काँग्रेसने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडेंनंतर आता फडणवीस महाजनांचाही राजकीय काटा काढणार वाटतं, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. एकनाथ खडसे आधी भाजपात जेष्ठ नेते होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत एकनाथ खडसे भाजपमधून बाहेर पडले. तर विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर काढल्याचा आरोप विरोधक भाजपवर करत असतात.

भाजपमध्ये अपमानास्पद वागणूक मिळाली- एकनाथ खडसे
“भाजपमध्ये मेहनत घेऊन मी कष्टाने काम केलेलं आहे. पण नंतरच्या कालखंडामध्ये मला अपमानास्पद वागणूक मिळाली. माझी अडवणूक झाली बऱ्याच केसेस माझ्यावर लादण्यात आल्या. खोट्या भूखंडाच्या केसेस करण्यात आल्या. त्यामुळे मी भाजप सोडली असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने मला सन्मानाने विधान परिषदेवर पाठवले आहे. मी राजकारणातून बाहेर गेलेलो, अशावेळी मला राष्ट्रवादी काँग्रेसने मला मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करण्याचा प्रश्न नाही”, असे एकनाथ खडसे म्हणाले होते.
पंकजा मुंडे भाजपात नाराज?
पंकजा मुंडे म्हणाल्या की काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणी संपवू शकत नाही. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तरी ते मला संपवू शकत नाहीत, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. पंकजा मुंडे भाजपात नाराज आहेत का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Gopichand Padalkar | “जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या बापाची जहागिरीदारी असल्याप्रमाणे जयंत पाटील वागले”
- PFI च्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर, देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची सुरु होती तयारी
- Devendra Fadanvis on PFI : पीएफआय ही संघटना ‘सायलंट किलर’, बंदी योग्यच; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- Lalu Prasad Yadav | PFI नंतर RSS वर बंदी घाला – लालूप्रसाद यादव
- MNS | मनसे नेत्याने केली पंकजा मुंडेंची पाठराखण! म्हणाले, “भाजप सरकार सत्तेत आल्यापासून…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
