Share

राज्य दुहेरी संकटात असतानाही पवारांनी दोन माजी आमदारांचा करवून घेतला पक्षप्रवेश

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र एका बाजूला कोरोनाचा सामना करत आहे तर दुसऱ्या बाजूला आता  किनारपट्टीला ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला असताना. एवढे मोठे संकट आले असताना देखील राजकारणी मंडळी मात्र त्याचं राजकारण करतच असल्याचे दिसून येत आहे.

कधी परीक्षांचा मुद्दा तर कधी रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांचा मुद्दा या सारख्या मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. ‘वंचित बहुजन आघाडी’चे माजी आमदार बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी हा जोरदार धक्का मानला जात आहे.tv9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

Baliram-Shiraskar joins NCP-2

बळीराम शिरस्कर हे ‘वंचित’च्या तिकिटावर अकोल्यातील बाळापूरमधून आमदार होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिला होता. तर अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे यांनीही काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला सोडचिट्ठी दिली होती.

आज  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते. बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!