घोळ झाला… अन् राज्यपालांनी विचारलेल्या झाडाचे नाव एकाही मंत्र्याला सांगता आले नाही…

बुलढाणा: महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ५ फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी जिजाऊ जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथील राजवाड्याला भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर मोती तलाव परिसरामध्ये देखील त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी मोती तलाव परिसरात असलेल्या झाडाचे नाव विचारले  असता तेथे उपस्थित एकाही व्यक्तिला सांगता आले नाही.

त्यावेळी तेथे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्चेह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यांना त्या झाडाचे नाव सांगता आले नाही, त्यामुळे राज्यपालांनी या सर्वांना परिसरात असलेल्या वनस्पती व झाडांची माहिती असणे आवश्यक असल्याचे बोलून दाखवले.

यावेळी यांनी हा विषय वळवण्याचा प्रयत्न केला, घटनास्थळी राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकारी, जया वाहने, शिवाजी राजे जाधव, राष्ट्रवादीचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष एड. नाझेर काझी यांच्यासह जिल्हाधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते, परंतु या सर्वांनाच त्या ठिकाणी असलेल्या झाडाचे नाव माहीत नसणे ही एक प्रकारे शोकांतिकाच म्हणावी लागेल.

महत्वाच्या बातम्या: