Share

“…ना हुंकार फक्त लावंगीच्या फुसक्या माळा” ; उद्धव ठाकरेंच्या सभेवर मनसेची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल (८ जून) औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही औरंगाबाद येथे सभा घेतली होती. मात्र सध्या उद्धव ठाकरेंच्या सभेच्या गर्दीवरून विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना निशाण्यावर धरले जात आहे. या पार्श्वभूमीवरच आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे.

मनसे नेत संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. संदीप देशपांडे म्हणाले, “ना पाणी प्रश्नावर ठोस भूमिका, ना हिंदुत्वावर, ना शहराच्या नामांतरणावर, ना हुंकार फक्त लावंगीच्या फुसक्या माळा”.

तसेच यासच अमित ठाकरे यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या सभेवर ट्वीट करत प्रश्न उपस्थित केला आहे. अमित ठाकरे म्हणाले,  “छत्रपती संभाजी महाराज टकमक टोकावर घेऊन जातील हे राष्ट्रवादी, काँग्रेसच्या साथीने सत्ता टिकवल्यानंतर हिंदुत्व सोडल्यावर बोलतील हे यांना का वाटू लागलं?”

 

कालच्या सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

कालच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, “मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो. मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील. संभाजीनगर नामकरण हे वचन माझ्या वडिलांनी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले आहे. त्याचा विसर पडणे शक्य नाही. नामकरण मी करेन तेंव्हा छत्रपती संभाजीराजे यांना अभिमान वाटेल असे शहर मी घडवुन दाखवेन”.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!