औरंगाबाद : मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन होऊन 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या शाखेचा वर्धापनदिन आज असून त्यानिमित्त उद्धव ठाकरे औरंगाबादला सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला चांगलेच फटकारले.
हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतं? भाजपा जर ऐकत नसेल तर संघाने त्यांच्या कानाखाली मारली पाहिजे. म्हणून मी संघावर टीका केली. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. जो देशासाठी मरायला तयार असतो तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मुसलमानांचा द्वेष करायला शिकवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला. देशाची रक्षा करता करता औरंगजेब नावाचा जवानाने बलिदान दिलं. त्याला आम्ही परकं म्हणत नाही. तो आमचा आहे. असा दाखला देत उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले.
तसेच अच्छे दिन आले का? कधी येणार? काहीच नाही, ते झटकून टाकतात. निवडणुका आल्यानंतर नको त्या खपल्या काढल्या जातात. पुन्हा एकदा धर्माची अफूची गोळी द्यायची आणि धर्माच्या नावावर मतं मिळवून सत्तेवर यायचं, मतदार मेला तरी चालेल. निवडणुका आली की पुन्हा कोणती तरी मशीद पाडू म्हणजे सगळे पुन्हा त्यांच्या मागे, अशी भाजपाची थेरं असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- …तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील – उद्धव ठाकरे
- “वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना तुरुंगात टाकणार” – उद्धव ठाकरे
- मितालीच्या निवृत्तीनंतर ‘या’ खेळाडूला मिळालं एकदिवशीय संघाचं कर्णधारपद; वाचा!
- “हातात दांडा घ्या आणि सरळ…”, पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्तांना आदेश
- मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे- संजय राऊत


