औरंगाबाद : मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन होऊन 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या शाखेचा वर्धापनदिन आज (८ जून) असून त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादला सभा घेतली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत टोला लगावला.
रोज ज्यांच्या स्वप्नात उद्या सरकार पडणार, परवा सरकार पडणार असं वाटत होतं. पुन्हा येणार म्हणत होते त्यांना कळलंही नाही की, महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळणं तेही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत इतके दिवस ज्यांच्याविरोधात आपण लढत होतो त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन राज्याचा विकास करण्यासाठी मदत केली. मित्र हाडवैरी बनला आणि शत्रू मित्र बनले आहेत. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी भाजपाने औरंगाबादेत पाणीप्रश्नाच्या मुद्द्यावर जलआक्रोश मोर्चा काढला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, “मध्ये कोणीतरी आक्रोश काढला होता. हा आक्रोश मोर्चा पाण्यासाठी नव्हता तर सत्ता गेली म्हणून होता. पाच वर्षे तुम्ही सत्तेत होते. आम्ही तुमच्यासोबत होतो. त्या वेळी या योजनेला किती पैसे दिले होते. का भूमिपूजन करु शकले नव्हते. मात्र निवडणूक आली की काहितरी बोलायचं आणि निवडणूक जिंकून जायचं. निवडणूक जिंकली की तंगवत ठेवायचं हे हिंदूत्त्व बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेलं नाही.”
महत्वाच्या बातम्या:
- “गोपीनाथ मुंडेंनी मागणी करताच बाळासाहेबांनी…” ; उद्धव ठाकरेंनी करुन दिली भाजपला आठवण!
- “भाजपाच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे…”, मोहम्मद पैगंबरांच्या अवमानावरून उद्धव ठाकरेंनी सुनावले
- “निवडणुका आल्या की धर्माची अफूची गोळी द्यायची ही भाजपची थेरं” ; उद्धव ठाकरे यांचा जोरदार घणाघात
- “…तर संघ काळी टोपी का घालतं?”, मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला सवाल
- …तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
