Share

“भाजपाच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे…”, मोहम्मद पैगंबरांच्या अवमानावरून उद्धव ठाकरेंनी सुनावले

Published On: 

औरंगाबाद: भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्या सध्या प्रचंड चर्चेत आहेत. या वक्तव्यावरून नुपूर शर्माला भाजपमधून निलंबित करण्यात आले असून याबाबतीत त्यांनी माफीही मागितली आहे. यावरच आज औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभेत भाजपवर निशाणा साधत खडेबोल सुनावले.

“आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी मुस्लिमांचा द्वेष करण्यास शिकवलं नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत. आमच्यासाठी देश हाच धर्म आहे. मात्र धर्माचं वेड घेऊन आमच्या अंगावर आलात तर त्याला प्रत्युत्तर देऊ. त्या कुणीतरी भाजपाच्या टिनपाट प्रवक्त्यांनी प्रेषितांचा अवमान केला. आमच्या देवतांचा अवमान केला तर राग येतो. मग त्यांच्या प्रेषितांचा अपमान करण्याची गरज नव्हती. यानंतर अरब देश एकत्र आले. माफी मागण्याची मागणी केली. भारताच्या पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीवर लावला. गुन्हा भाजपाच्या प्रवक्त्याने केला. मग त्यासाठी देशावर नामुष्की कशाला. भाजपाची भूमिका ही देशाची भूमिका असू शकत नाही. टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर नामुष्की ओढवतेय, हे तुम्हाला मान्य आहे का?”, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलेच सुनावले.

तसेच हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतं? भाजपा जर ऐकत नसेल तर संघाने त्यांच्या कानाखाली मारली पाहिजे. म्हणून मी संघावर टीका केली. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. जो देशासाठी मरायला तयार असतो तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मुसलमानांचा द्वेष करायला शिकवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला. देशाची रक्षा करता करता औरंगजेब नावाचा जवानाने बलिदान दिलं. त्याला आम्ही परकं म्हणत नाही. तो आमचा आहे. असा दाखला देत उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!