Share

Raj Thackeray | राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना, ‘या’ विषयावर बोलण्यास बंदी

Published On: 

Raj Thackeray | मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपटाबाबत कुणीही भाष्य करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचा आरोप माजी खासदार संभाजीराजे यांनी केला. त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या विषयाला जातीय रंग देत असून सध्या आपण या विषयावर बोलू नये, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस या विषयावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याविरोधात मोठं आंदोलन केलं.

जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनानंतर चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेचा निषेध केला. खरी शिवभक्ती काय असते, ते राज ठाकरे यांच्याकडून शिका, असा टोला त्यांनी लगावला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी चित्रपटाचा शो पुन्हा सुरु केला. त्यामुळे या चित्रपटावरून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आल्याचं चित्र आहे.

आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून या चित्रपटावर भाष्य केलं. राष्ट्रवादीच्या डोक्यातून जात अजिबात जात नाही, अशी टीका देशपांडे यांनी केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या प्रवक्त्यांना सध्या या विषयावर भाष्य करणे टाळण्याचे आदेश दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!