औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद शहरामध्ये जाहिर सभा होत आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेने या सभेसाठी जोरदार तयारी केली होती. औरंगाबादमध्ये गावागावात बैठका घेत शिवसेनेने शक्ती पणाला लावली होती. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा झाली. या सभेला शिवसेनेने स्वाभिमान सभा असे नाव दिलेले आहे. या सभेत शिवसेना शक्तिप्रदर्शन करून विरोधकांना सणसणीत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत केला. राज्यभरातून शिवसैनिक औरंगाबादमध्ये या सभेसाठी दाखल झाले होते. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला.
अच्छे दिन आले का? कधी येणार आहेत अच्छे दिन? त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही, ते हात झटकून टाकतात. निवडणुका आल्यानंतर नको नको त्या खपल्या काढल्या जातात. पुन्हा एकदा धर्माची अफूची गोळी द्यायची आणि धर्माच्या नावावर मतं मिळवून सत्तेवर यायचं, मतदार मेला तरी चालेल. निवडणुका आली की पुन्हा कोणती तरी मशीद पाडू म्हणजे सगळे पुन्हा त्यांच्या मागे, ही अशी भाजपाची थेरं सुरू आहेत,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला.
“आपल्या प्रवक्त्यांच्या डोक्यात जर मेंदू असेल तर त्यांना काही गोष्टी भाजपने शिकवा. ते जी भाषा वापरत आहे ती भाषा आमचे प्रवक्ते वापरणारच नाही असं नाही. आमचा संयम सुटला तर आम्ही तेही करू शकतो. मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- …तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील – उद्धव ठाकरे
- “वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना तुरुंगात टाकणार” – उद्धव ठाकरे
- मितालीच्या निवृत्तीनंतर ‘या’ खेळाडूला मिळालं एकदिवशीय संघाचं कर्णधारपद; वाचा!
- “हातात दांडा घ्या आणि सरळ…”, पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्तांना आदेश
- मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे- संजय राऊत


