औरंगाबाद : शिवसेनेची ३७ वर्षांपूर्वी औरंगादाबादेत शाखा स्थापन झाली होती. त्याच शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदाानावर विराट सभा होतीय. “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो”, असं म्हणत मुख्यमंत्री भाषणाला सुरुवात केली. या सभेला शिवसेनेने स्वाभिमान सभा असे नाव दिलेले आहे. या सभेत शिवसेना शक्तिप्रदर्शन करून विरोधकांना सणसणीत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यभरातून शिवसैनिक औरंगाबादमध्ये या सभेसाठी दाखल झाले होते. उद्धव ठाकरेंनी या सभेत अनेक मुद्द्यांवरून भाजपला लक्ष्य केले आहे.
उद्धव ठाकरेंनी या सभेदरम्यान दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची एक आठवण सांगितली. उद्धव ठाकरे म्हणाले, “संभाजीनगरच्या विषयी एकदा गोपीनाथ मुंडे घरी आले होते. तेव्हा ते यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना महापौर पद आम्हाला द्या, अशी मागणी केली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी एका क्षणात होकार दिला. ते कागदावर आकडेमोड करत बसले नाहीत, की आमचे नगरसेवक किती तुमचे नगरसेवक किती वगैरे, एका क्षणात म्हणाले की, महापौर पद दिलं”
यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली, “आपल्या प्रवक्त्यांच्या डोक्यात जर मेंदू असेल तर त्यांना काही गोष्टी भाजपने शिकवा. ते जी भाषा वापरत आहे ती भाषा आमचे प्रवक्ते वापरणारच नाही असं नाही. आमचा संयम सुटला तर आम्ही तेही करू शकतो. मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतं? भाजपा जर ऐकत नसेल तर संघाने त्यांच्या कानाखाली मारली पाहिजे. म्हणून मी संघावर टीका केली. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. जो देशासाठी मरायला तयार असतो तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मुसलमानांचा द्वेष करायला शिकवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला. देशाची रक्षा करता करता औरंगजेब नावाचा जवानाने बलिदान दिलं. त्याला आम्ही परकं म्हणत नाही. तो आमचा आहे, असा दाखला देत उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले.
महत्वाच्या बातम्या:
- …तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील – उद्धव ठाकरे
- “वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना तुरुंगात टाकणार” – उद्धव ठाकरे
- मितालीच्या निवृत्तीनंतर ‘या’ खेळाडूला मिळालं एकदिवशीय संघाचं कर्णधारपद; वाचा!
- “हातात दांडा घ्या आणि सरळ…”, पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्तांना आदेश
- मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे- संजय राऊ


