Share

“अंगावर शाॅल टाकली म्हणून कुणी बाळासाहेब…”, रोहित पवार यांचा राज ठाकरेंना टोला

Published On: 

🕒 1 min read

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळावा आणि त्यानंतर झालेली उत्तर सभा यात राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत जोरदार हल्ला केला होता. शरद पवारांमुळे महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण करण्यात आले, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. यावर स्वतः शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. मात्र आता राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (rohit pawar) यांनीही प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे.

“आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नरेटिव्ह सेट केला जात असून राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपची आहे. राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करत आहेत. मात्र अंगावर शॉल टाकली म्हणून कुणी बाळासाहेब होत नाही. राज ठाकरे  चांगले अभिनेते आहेत, ते चांगला अभिनय करतात.”, असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

पुढे ते म्हणाले की,  मला राज ठाकरेंचं भाषण आवडायचं. मात्र, आता ते भाजप जे सांगतं ते करत आहेत. सध्या विकासाच्या मुद्द्यावर कुणीही बोलत नाही. मात्र, आपण विकासाचे मुद्दे लोकांसमोर घेऊन जाणार. असे रोहित पवार म्हणाले आहेत. तसेच जातीपातीच्या टीकेवर ते म्हणाले की, देशात हजारो वर्षापासून जात आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जातीबद्दल अभिमान होता. पण 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला. आमच्या मुलांची माथी भडकावली गेली.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!