Share

Raj Thackeray : पवारांनी सांगितलं म्हणून मी माझा पक्ष काढेल का? राज ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

Published On: 

मुंबई : राज ठाकरेंनी मागील काही दिवसांपूर्वी जाहीर सभा घेतल्या होत्या. या सभांमध्ये त्यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली होती. तसेच या सभांमध्ये बोलताना त्यांनी अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी त्यांनी अशाच सर्वांमध्ये बोलताना अनेक वेळा नरेंद्र मोदींवर प्रखरतेने टीका केली होती. मात्र यावर्षी त्यांनी सभांमध्ये नरेंद्र मोदींचे गुणगान गायल्याने इतर पक्षांकडून राज ठाकरेंवर वारंवार टीका झाली. तसेच महाविकास आघाडी विरोधात बोलण्यासाठी राज ठाकरे यांना भाजपने सुपारी दिली आहे असाही आरोप करण्यात आला होता. दरम्यान, शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच राज ठाकरेंनी त्यांचा पक्ष मनसेची स्थापना केली असल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबत मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र आता राज ठाकरे यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

राज ठाकरेंना पक्ष स्थापनेसाठी शरद पवारांनी मदत केली होती का, असे विचारले असता ते म्हणाले,”हल्ली या गोष्टी फार सोप्या झाल्या आहेत. मध्यंतरी एकजण पोरकटपणे बोललं की शरद पवारांनी सांगितलं म्हणून राज ठाकरेंनी पक्ष काढला. पवारांनी सांगितलं म्हणून मी माझा पक्ष काढेल का? बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्यासमोर स्वतःचा राजकीय पक्ष काढणं सोपी गोष्ट होती का? आणि तेव्हा माझा आणि शरद पवारांचा काय संबंध होता?” असे स्पष्ट वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.

आपल्याकडे राजकारणात काही घडले की लगेच भाजप किंवा शरद पवारांकडे बोट दाखवण्याची सवय झाली आहे. असे कामेही त्यांचीच लोक करतात आणि स्वतःची पब्लिसिटी वाढवण्याचा प्रयत्न करतात. एखादी गोष्ट जर करायची असेल तर भाजप मला का सांगेल? ते त्यांचे करतील ना त्यांच्याकडे लोकं आहेत ही काम करण्यासाठी. एखादा लहान पक्ष जर पुढे येत असेल तर त्या मागे कोणाचातरी हात आहे असे जाणून बुजून म्हटले जाते, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना राज ठाकरेंनी असदुद्दीन ओवेसी वरही तंज कसला. “भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांविषयी ऐकलेली गोष्ट केवळ उद्धृत केली होती. या वक्तव्याबाबत अनेकांनी माफीही मागितली आहे. यानंतर त्यांच्या या वक्तव्यामुळे नुपूर शर्मा यांच्यावर पक्षाकडूनही कारवाई करण्यात आली होती. मात्र दुसरीकडे ओवेसी त्याच्या जाहीर भाषणांमध्ये आमच्या देव देवतांबद्दल वाटेल ते बोलतोय याबाबत कधी कोणी माफी मागितली नाही? हा माणूस आमच्या देवी देवतांबद्दल जे काही वाईट बोलला आहे तेही मी एक दिवस दाखवेल, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!