जळगाव : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. सरकार असताना अनेकदा त्यांची भेट घेतली, मात्र न्याय मिळाला नाही, अशी खंत खडसेंनी व्यक्त केली. कार्यकर्ते-नेते जोपर्यंत एकत्र येत नाहीत, तोपर्यंत संघटना मजबूत होत नाही. पाया मजबूत झाला, तर निवडणुकांमध्ये यश मिळेल असं यावेळी खडसे म्हणाले. मला नाही वाटत लोकं खोक्यांमुळे निवडून येतात लोकं कामामुळे येतात. असं खडसे म्हणाले.
यावेळी बैठकीत अनेकांनी सांगितलं की आपलं सरकार असतानाही एकनाथ खडसेंना न्याय मिळाला नाही. मात्र हे खर आहे मी अनेकदा शरद पवार आणि जयंत पाटील अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र पुढे काय झाले आपण सर्वांना ठाऊकच आहे. असे म्हणत एकनाथ खडसे यांनी बोलने टाळले . सर्वांचं समाधान करणारा माणूस जन्माला आलेला नाही. यावरून खडसे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सरकार असताना अनेकदा त्यांची भेट घेतली मात्र न्याय मिळाला नाही असेही खडसे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- CM Eknath Shinde | सामान्यांचा रोजचा त्रास मुख्यमंत्र्यांनी काही वेळ भोगला! अन् घेतला ‘हा’ निर्णय
- Ambadas Danve |”मंत्री भुमरेंच्या कार्यक्रमाला रिकाम्या खुर्च्यांची उपस्थिती”; अंबादास दानवेंचा टोला
- Kirit Somaiya | अनिल परब यांच रिसॉर्ट पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकार खर्च करणार – किरीट सोमय्या
- Jitendra Awhad | “आमची झोप मोडून जर रेल्वे प्रवास करणार असेल तर… “; आव्हाडांचा इशारा
- India vs Pakistan | भारताने टॉस जिंकला! जाणून घ्या, भारताची प्लेइंग इलेव्हन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

