Share

NCP vs BJP | भाजपने शिवसेना फोडली ; रामदास कदमांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे जोरदार प्रत्युउत्तर!

Published On: 

पुणे : राज्यात गढूळ राजकारण पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडत राज्यात सरकार स्थापन केले. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडावी, अशी मागणी शिंदे गटातील आमदार करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनतून हकालपट्टी झालेले रामदास कदम यांनी शरद पवार आणि अजित पवार यांनी शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस ने जोरदार प्रत्युउत्तर दिले आहे.

रामदास कदम यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी बंड खोर नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. बंडखोर शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी ही शिवसेना फोडली. स्वतःची कृती योग्य आहे, असे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वर खापर फोडले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी चांगल्या पद्धतीचा कारभार केला होता. खंबीरपने आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. २०१९ चा राग घेऊन भाजपने पोलीस बळाचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करून शिवसेना फोडली, असा आरोप महेश तपासे यांनी केला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी देखील शिंदे गटाला सुनावले आहे. “शिवसेना पक्षातील काही लोक व त्यांचे बंडखोर आमदार यांच्यात काही झाले की आलेच शरद पवार साहेबांना मध्ये घ्यायला. बाबांनो तुमचे काम, तुमचे वाद स्वतःच्या हिंमतीवर करा. कशाला तुमचे खापर शरदजी पवार साहेबांवर फोडता. सत्तापिपासूमुळे वाण नाही पण गुण लागला वाटत तुम्हाला,” असे ट्वीट रुपाली पाटील यांनी केले आहे.

काय म्हणाले होते रामदास कदम –

रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांनी डाव साधला. संधी पाहून त्यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. तसेच अजित पवार यांचा प्रशासकीय अनुभव प्रचंड आहे, त्याच्या जोरावर त्यांनी देखील शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केल्याचे रामदास कदम म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!