Share

Nitish Kumar | “आम्ही राहू किंवा न राहू, पण ते…” ; शपथ घेताच नितीश यांचा मोदींवर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

पाटणा : भाजप सोडून नितीश कुमार यांनी बुधवारी राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन केले. त्याची औपचारिकताही शपथविधी सोहळ्याने पूर्ण झाली. आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीशकुमार यांनी त्यांचा जुना मित्रपक्ष असलेल्या भाजपवर जोरदार हल्ला चढवला. 2024 च्या निवडणुकीत आम्ही राहू किंवा न राहू पण भाजप राहणार नाही, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यासोबतच आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. ते सात पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करणार आहेत. या आघाडीला अपक्षांचा पाठिंबा आहे. महाआघाडीत जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, हम आणि डावे पक्ष आहेत.

नितीश कुमार यांनी मंगळवारी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेतली आणि आठव्यांदा राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला. वास्तविक, नितीश कुमार यांनी मंगळवारी दोनदा राज्यपालांची भेट घेतली होती. पहिल्यांदा त्यांनी एनडीए आघाडीचे नेतृत्व करत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला, तर दुसऱ्यांदा तेजस्वी यांनी विरोधी महाआघाडीच्या इतर मित्रपक्षांसह राजभवनात जाऊन 164 आमदारांच्या पाठिंब्याची यादी सादर केली. सध्या बिहार विधानसभेत 242 सदस्य आहेत आणि बहुमताचा आकडा 122 आहे.

अमित शहा जेडीयूमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत-

आमदारांसोबतच्या बैठकीत नितीश कुमार यांनी आरोप केला की, केंद्रीय मंत्री अमित शहा सतत जेडीयूमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. नितीश कुमार यांनी पक्षाचे माजी नेते आरसीपी सिंह हे अमित शहा यांचे प्यादे म्हणून काम करत असल्याचा आरोप केला होता.

शरद पवार यांची टीका-

शरद पवार म्हणाले, “पंजाबमधील अकाली दल हा मोठा पक्ष त्यांच्यासोबत होता. तो पक्ष भाजपने जवळपास संपुष्टात आणला आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप अनेक वर्ष एकत्र होते. आज शिवसेनेचे विभाजन करून शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भाजपने केली. त्याला एकनाथ शिंदे आणि इतर लोकांची मदत झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेनेवर एकप्रकारचा आघात त्यांच्या एकेकाळच्या मित्रपक्षाने केला. हेच चित्र बिहारमध्ये दिसत होते.”

“नितिश कुमार हे लोकमान्यता असलेले नेतृत्व आहे. मागील निवडणुकीत नितिश कुमार आणि भाजप एकत्र लढले. परंतु भाजपचे अजून एक वैशिष्ट्य असे आहे की ते निवडणुकीत एकत्र येतात आणि मित्रपक्षाचे लोक कसे कमी निवडून येतील याची काळजी घेतात. हे महाराष्ट्रातही घडले. असेच चित्र बिहारमध्येही दिसायला लागले. बिहारचे मुख्यमंत्री वेळीच सावध झाले आणि भाजपपासून दूर होण्याची भूमिका त्यांनी घेतली. आज भाजपचे नेते त्यांच्याबद्दल टीकाटिप्पणी करत आहेत पण नितिश कुमार यांनी टाकलेले पाऊल अत्यंत शहाणपणाचे आहे. उद्या जे संकट भाजप त्यांच्यावर आणणार आहे त्याची वेळीच नोंद घेऊन त्यांनी खबरदारी घेतली. त्यांनी राज्याच्या आणि त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने अतिशय योग्य निर्णय घेतला,” असे शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!