मुंबई : उच्च न्यायालयाने शिवसेनेतील शिंदे गटाला मोठा दणका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या बाजूने निकाल देताना मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे. मात्र यासाठी काही कालमर्यादेच्या अटी असतील. यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे आश्वासनही शिवसेनेच्या उद्धव गटाकडून घेण्यात आले आहे. दरम्यान उच्च न्यायालयाचा निर्णयाचे शिवसैनिक स्वागत करत आहेत. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला टोमणा मारला आहे.
“फक्त मैदानावर सभा घेण्याची परवानगीच मिळाली ना?. मला वाटलं आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील. नाचे कुठले,” असा टोमणा नितेश राणे यांना मारला आहे. काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची औकाद काढली होती. राणे आणि ठाकरे यांच्यात सतत वाद होत असतात.
न्यायालयाच्या निकालानंतर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया
अनिल परब म्हणाले, “१९६६ पासून शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. शिवसेना आणि शिवाजी पार्क यांच नात उच्च न्यायालयाने अधोरेखित केलं आहे. एक नेता, एक व्यासपीठ, एक झेंडा, एक जागा हे जे समीकरण आहे. याला उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. आम्ही मुंबई महापालिकेकडे पाठवला होता. गेले काही दिवस त्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नव्हता. वारंवार विचारणा केल्यानंतर आमचा अर्ज कायदा व सुव्यवस्थेचे कारण सांगत नाकारण्यात आला. त्याआधीच आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.”
काल दादरचे आमदार सदा सरवणकर यांनी देखील याचिका दाखल केली होती. त्यांनी न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. दोन शिवसेना असल्याचे त्यांनी न्यायालयाला भासवले. परंतू न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. तसेच आम्हाला २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर असा दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. महानगरपालिकेचे जे काही आक्षेप होते ते कार्टाने फेटाळून लावले आहेत.
न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले-
अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या आधारावर गेल्या सात दशकांत कधीही अर्ज फेटाळण्यात आलेला नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना रॅली काढू न देऊन बीएमसीने आपल्या अधिकारांचे उल्लंघन केले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. बीएमसीचे वकील मिलिंद साठ्ये यांनी शिवाजी पार्क हा सायलेंट झोन असल्याचा युक्तिवाद केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य केला नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Glowing Skin | चमकदार त्वचा हवीये? मग ‘या’ ज्यूसचे करा सेवन
- Anil Parab | शिवसेनेचा दसरा मेळावा ‘शिवतिर्थ’वर! न्यायालयाच्या निकालानंतर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया
- Health Tips | बदलत्या हवामानामध्ये शरीर सुदृढ ठेवायचे असेल, तर करा ‘या’ काढ्याचे सेवन
- Ajit Pawar | “मला गृहमंत्री व्हायचं होतं. मात्र, वरिष्ठांनी…”; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
- Hero Electric Scooter | इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करत आहात,तर हिरो इलेक्ट्रिकच्या ‘या’ मॉडेल्सचा नक्की विचार करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

