Share

Health Tips | बदलत्या हवामानामध्ये शरीर सुदृढ ठेवायचे असेल, तर करा ‘या’ काढ्याचे सेवन

Published On: 

🕒 1 min read

आपल्याला माहित आहे की वर्षात तीन ऋतू असतात. त्यानुसार वातावरणात बदल होत असतात. परंतू प्रदुषणामुळे, निसर्गाच्या हानीमुळे कोणता ऋतू केव्हा सुरू होतो किंवा संपतो याचा अंदाज लावणे कठीण झालं आहे. या वारंवार बदलत राहणाऱ्या हवामानामुळे आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. काहींना लगेचंच व्हायरल इन्फेक्शनही होते. तर काहींना वातावरणात बदल झाल्यामुळे ताप, सर्दी अशा अजारांना सामोरे जावे लागते.

जर तुम्हालाही या बदलत्या हवामानामध्ये शरीर सुदृढ ठेवायचं असेल, तर खाली सांगितलेल्या काढ्याचे सेवन करा.

तुळशीचा काढा-

तुळशीचे आयुर्वेदात खूप उपाय सांगितले आहेत. यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. जे आरोग्यासाठी रामबाण उपाय ठरतात. जसे की तुळशीमध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यासोबतच किडनीही स्वच्छ होते. याव्यतिरिक्त, यूरिक ऍसिडचे प्रमाण कमी होते. विशेषत: सर्दी, खोकला आणि फ्लूमुळे होणाऱ्या त्रासातून लवकर आराम मिळतो. यासाठी रोज सकाळी तुळशीचा काढा प्यावा.

काढ्यासाठी आवश्यक घटक-

-5 तुळशीची पाने

– 5 लवंगा

– आल्याचा छोटा तुकडा

– 1 टीस्पून लिंबाचा रस

– काळे मीठ चवीनुसार

कृती –

एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्या आणि ते गॅसवर ठेवून उकळवा. नंतर त्यामध्ये तुळशीची पाने, लवंगा, आले चांगले टाका आणि पाणी चांगले उकळवू द्या. नंतर ते पाणी गाळून घ्या आणि त्यामध्ये काळे मीठ आणि लिंबाचा रस टाकून तयार झालेला काढा प्या.

 

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!