🕒 1 min read
आजकाल महिलांसोबतच पुरूषांनाही आपली त्वचा चमकदार असावी असं वाटतं असतं. यासाठी अनेक उपाय केले जातात. एवढंच नाहीतर काहीजण तर डाॅक्टरांकडे जाऊन मेडीसीन खातात, मात्र तरीही त्यांची त्वचा पाहिजे तेवढी चमकदार दिसून येतं नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की, जो आहार आपण करत असतो. जे पदार्थ आपण खातो. त्याचाच परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. तर आज आम्ही तुम्हाला घरगुती आहाराचा समावेश करून चमकदार त्वचा कशी करायची याविषयी सांगणार आहोत.
खालील ज्यूसचा समावेश तुम्ही तुमच्या आहाराध्ये केला तर तुम्हाला उत्तम रिझल्ट पाहयला मिळतील
1. संत्री आणि आल्याचा ज्यूस –
आबंट फळे निरोगी त्वचेसाठी फायदेशीर असतात. मोसंबीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करतात. संत्रीमंध्ये व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे आपली त्वचा उजाळण्यास त्याचा फायदा होतो. आले, ज्याची चव गोड आणि सौम्य असते, परंतु त्वचेसाठी ते उपयुक्त होते.
2. टोमॅटो ज्यूस –
व्हिटॅमिन-सी त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन-सी महत्त्वाचे आहे, कारण त्यातील अँटिऑक्सिडंट्स कोलेजनच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्याला असं वाटतं की, व्हिटॅमिन सी हा घटक केवळ आंबट फळांमध्येच असते. परंतू टोमॅटोमध्ये देखील व्हिटॅमिन सी भरपूर असते,जे त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहार याचा समावेश करणे आवश्यक आहे.
3. हिरव्या भाज्यांचा ज्यूस –
हिरव्या पालेभाज्या कॅरोटीनोइड्सचा उत्कृष्ट स्रोत असतात. व्हिटॅमिन-ए किंवा कॅरोटीनॉइड्सच्या अतिसेवनाने आपल्या त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही. हा रस तयार करण्यासाठी एक केळ आणि पालक एकत्र करा. नंतर त्यात काही पुदिन्याची पाने घाला आणि यामध्ये आवडीची फळे घाला. त्यानंतर तयार झालेला रस प्या.
4. गाजरचा ज्यूस-
गाजरांमध्ये त्वचेला चालना देणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यामध्ये बायोटिन आणि व्हिटॅमिन ए या दोन्हींचाही समावेश असतो. गाजराच्या रसाचे फायदे वाढवण्यासाठी तुम्ही त्यात हळद देखील घालू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | “मला गृहमंत्री व्हायचं होतं. मात्र, वरिष्ठांनी…”; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
- Hero Electric Scooter | इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करत आहात,तर हिरो इलेक्ट्रिकच्या ‘या’ मॉडेल्सचा नक्की विचार करा
- Shivsena | शिंदे गटाला मोठा धक्का! न्यायालयाने शिवसेनेला ‘शिवतिर्थ’वर दसरा मेळाव्याची दिली परवानगी
- Skin Care Tips | दररोज एक चमचा तुप चेहऱ्यावर लावा आणि अनेक फायदे मिळवा,जाणून घ्या!
- Shivsena । “मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे की किराणा दुकानावरचा गल्ला? शेठ नसले तरी दाखले शेठ दुकान चालवतात”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
