Share

Anil Parab | शिवसेनेचा दसरा मेळावा ‘शिवतिर्थ’वर! न्यायालयाच्या निकालानंतर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : उच्च न्यायालयाने शिवसेनेतील शिंदे गटाला मोठा दणका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या बाजूने निकाल देताना मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे. मात्र यासाठी काही कालमर्यादेच्या अटी असतील. यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे आश्वासनही शिवसेनेच्या उद्धव गटाकडून घेण्यात आले आहे. दरम्यान उच्च न्यायालयाचा निर्णयाचे शिवसैनिक स्वागत करत आहेत. यावर शिवसेना नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल परब म्हणाले, “१९६६ पासून शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. शिवसेना आणि शिवाजी पार्क यांच नात उच्च न्यायालयाने अधोरेखित केलं आहे. एक नेता, एक व्यासपीठ, एक झेंडा, एक जागा हे जे समीकरण आहे. याला उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. आम्ही मुंबई महापालिकेकडे पाठवला होता. गेले काही दिवस त्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नव्हता. वारंवार विचारणा केल्यानंतर आमचा अर्ज कायदा व सुव्यवस्थेचे कारण सांगत नाकारण्यात आला. त्याआधीच आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.”

दादरचे आमदार सदा सरवणकर यांनी देखील याचिका दाखल केली होती. त्यांनी न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. दोन शिवसेना असल्याचे त्यांनी न्यायालयाला भासवले. परंतू न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. तसेच आम्हाला २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर असा दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. महानगरपालिकेचे जे काही आक्षेप होते ते कार्टाने फेटाळून लावले आहेत.

न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले-

अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या आधारावर गेल्या सात दशकांत कधीही अर्ज फेटाळण्यात आलेला नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना रॅली काढू न देऊन बीएमसीने आपल्या अधिकारांचे उल्लंघन केले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. बीएमसीचे वकील मिलिंद साठ्ये यांनी शिवाजी पार्क हा सायलेंट झोन असल्याचा युक्तिवाद केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य केला नाही.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!