🕒 1 min read
पुणे : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्याचबरोबर सध्या निवडणुकांचही वारं घुमू लागलं आहे. सर्व पक्षांनी आगामी निवडणुकांसाठीची तयारी देखील सुरू केली असून, याच पार्श्वभूमीवर भाजप पक्षासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही दौरे सुरू केले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार पुणे दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी आपल्या मनातील एक खंत व्यक्त केली असल्याचं समजतं आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मला गृहमंत्री पद हवं होतं, असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. पुण्यात शहर कार्यकारणीच्या बैठकीत पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. मला उपमुख्यमंत्री बनवल्यानंतर मी वरिष्ठांकडे गृहखात्याची मागणी केली होती. मात्र, अनिल देशमुख यांना गृहमंत्री बनवण्यात आले.
त्यानंतर मी पुन्हा मागणी केली. तेव्हाही दिलीप वळसे पाटील यांना गृहमंत्री बनवण्यात आहे. कदाचित वरिष्ठांना वाटत असेल की याला गृहमंत्री बनवले तर हा आपलंही ऐकणार नाही, त्यामुळे मला गृहखातं दिलं नसेल, असं अजित पवार यांनी सांगितलं.
मला जे योग्य वाटत, तेच मी करतो-
तसेच अजित पवार सांगितले की, मला जे योग्य वाटत, तेच मी करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता जरी चुकला तरी त्याला माफी नाही. माझ्याकडे सर्वांसाठी नियम सारखा आहे. एखादा कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर मी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा असेल. मात्र, तोच जर चुकत असेल तर त्याला पाठिशी घालण्यात अर्थ नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Skin Care Tips | दररोज एक चमचा तुप चेहऱ्यावर लावा आणि अनेक फायदे मिळवा,जाणून घ्या!
- Shivsena । “मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे की किराणा दुकानावरचा गल्ला? शेठ नसले तरी दाखले शेठ दुकान चालवतात”
- Sudhir Mungantiwar | श्रीकांत शिंदेंच्या व्हायरल फोटोवर सुधीर मुनगंटीवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- Sandipan Bhumre | “निशाणा तुला दिसला ना…” मुख्यमंत्र्याची खिल्ली? संदिपान भुमरे यांचा VIDEO व्हायरल
- Tata Punch Camo Edition | Tata ने लाँच केले Punch चे नवीन Camo Edition
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
