Share

Hero Electric Scooter | इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करत आहात,तर हिरो इलेक्ट्रिकच्या ‘या’ मॉडेल्सचा नक्की विचार करा

Published On: 

🕒 1 min read

सध्या भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल, तर तुम्ही हिरो इलेक्ट्रिकच्या काही मॉडेल्सचा नक्कीच विचार करू शकता. या स्कूटर केवळ उत्तम रेंजच देत नाहीत तर त्यांची किमतही खूप कमी आहे. चला या कंपनीच्या काही सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल जाणून घेऊया.

हिरो ऑप्टिमा सिंगल बॅटरी

हीरोची ही इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरीसह येते, जी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी चार ते पाच तास घेते. ही स्कूटर 82 किमीपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. या गाडीचा कमाल वेग 45 किमी प्रतितास आहे. राखाडी, निळा आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध असलेल्या या स्कूटरमध्ये पोर्टेबल बॅटरी, अँटी थेफ्ट अलार्म, अलॉय व्हील, यूएसबी पोर्ट, रिमोट लॉक, एलईडी हेडलॅम्प यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 62 हजार रुपये आहे.

हिरो NYX

हिरो NYX इलेक्ट्रिक स्कूटरला पूर्ण चार्ज होण्यासाठी चार ते पाच तास लागतात. ही स्कूटर 82 किमीपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. या गाडीचा कमाल वेग 42 किमी प्रतितास आहे. यात पोर्टेबल बॅटरी, अलॉय व्हील, यूएसबी पोर्ट, स्प्लिट फोल्डिंग सीट, इन-डॅश बॉटल होल्डर, एलईडी हेडलॅम्प यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 63,990 रुपये आहे.

हिरो ऑप्टिमा ड्युअल बॅटरी

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दोन बॅटरी सपोर्ट आहे. ही स्कूटर 140 किमीपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. या गाडीचा कमाल वेग 45 किमी प्रतितास आहे. पूर्ण चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतात. यात पोर्टेबल बॅटरी, एलईडी हेडलॅम्प, अँटी थेफ्ट अलार्म, अलॉय व्हील, यूएसबी पोर्ट, रिमोट लॉक यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 77 हजार 490 रुपये आहे.

हीरो एट्रिया आणि एडी

हीरो एट्रिया आणि एडी दोघेही 25 kmph चा टॉप स्पीड मारू शकतात आणि या दोन्ही गाड्या 85 kms च्या रेंजमध्ये पोहोचण्यास सक्षम आहे. दोघांनाही पूर्ण चार्ज होण्यासाठी चार ते पाच तास लागतात.

फोटॉन इलेक्ट्रिक

ही स्कूटर 108 किलोमीटरपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. ही गाडी कमाल ४५ किमी प्रतितास वेगाने धावू शकते. या स्कूटरला पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. यात रिमोट लॉक, अँटी थेफ्ट अलार्म, अलॉय व्हील, पोर्टेबल बॅटरी यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 80 हजार 790 रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!