Share

IPL 2022 खेळणारा ‘स्टार’ खेळाडू झाला वेस्ट इंडिज संघाचा नवा कॅप्टन! पोलार्डनंतर सांभाळणार टीम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या निकोलस पूरन (Nicholas Pooran) याला वेस्ट इंडिजच्या टी-२० आणि एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार कायरन पोलार्डने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पूरन हा टी-२० च्या आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. त्याने ३०० हून अधिक षटकार मारले आहेत. त्याची नियुक्ती संघासाठी खूप महत्त्वाची आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२मध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. या संघाने दोनदा विश्वविजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. शाई होपला वनडे संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

क्रिकेट वेस्ट इंडिजचे संचालक जिमी अॅडम्स म्हणाले, ”निकोलसकडे चांगला अनुभव आहे. अशा परिस्थितीत तो संघाची कमान सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे. तो एक खेळाडू म्हणून परिपक्व झाला आहे, असे निवड समितीचे मत आहे.” कर्णधार बनल्यानंतर पूरन म्हणाला, ”कर्णधारपदाचा मला सन्मान वाटतो. मी अनेक दिग्गजांच्या पावलावर पाऊल ठेवणार आहे. ही माझ्यासाठी मोठी भूमिका आहे.”

२६ वर्षीय निकोलस पूरन म्हणाला, ”कर्णधार बनणे ही माझ्या कारकिर्दीसाठी खरोखरच मोठी आणि सन्मानाची गोष्ट आहे. संघाची कामगिरी पुढे नेण्याचा माझा प्रयत्न असेल.” पूरन सध्या आयपीएल खेळत आहे. त्याने वेस्ट इंडिजकडून ३७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ४०च्या सरासरीने ११२१ धावा केल्या आहेत. यात त्याने एक शतक आणि ८ अर्धशतके झळकावली आहेत. त्याचा स्ट्राइक रेट ९९ आहे. त्याच वेळी, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ५७ सामन्यांमध्ये त्याने २८ च्या सरासरीने ११९३ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!