🕒 1 min read
मुंबई : भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपल्या काळातील दिग्गज खेळाडूंवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. गांगुली म्हणाले की, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन आणि राहुल द्रविड यांच्याशी स्पर्धा करण्याचा विचार कधीच केला नाही. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी भरपूर क्रिकेट खेळले आहे. तर गांगुलीच्या नेतृत्वाखाली हे खेळाडूही क्रिकेटमध्ये खूप यशस्वी ठरले. तर मोहम्मद अझरुद्दीनने देखील अनेक वर्षे भारतीय संघाचे नेतृत्व केलं आहे.
मी म्होरक्या बनून संघाचं नेतृत्व केलं
सौरव गांगुली यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी त्यांच्या काळात संघातील खेळाडूंशी स्पर्धा करण्याचा कधीही विचार केला नाही आणि नेहमी एकत्र काम केले. इकॉनॉमिक टाइम्स इंडिया लीडरशिप कौन्सिलने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गांगुली म्हणाले की, ” एक कर्णधार आणि म्होरक्या यात खूप फरक असतो. एक कर्णधार म्हणून तुम्ही वरिष्ठ आणि युवा खेळाडूंचा तुमच्या नेतृत्वावर विश्वास कसा निर्माण करता हे खूप आव्हानात्मक काम आहे. माझ्यासाठी कर्णधारपद म्हणजे मैदानावर संघाचे नेतृत्व करणे आणि म्होरक्या म्हणजे संघाला कायम एकत्रित ठेवणे. त्यामुळे सचिन, अझर किंवा द्रविड यांच्याशी मी कधीच स्पर्धा केली नाही. एका म्होरक्याप्रमाणे मी त्यांच्याशी माझे नाते निर्माण केले आणि आपापसात जबाबदाऱ्या वाटून घेतल्या.”
सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात अभूतपूर्व बदल झाले. यावरही प्रतिक्रिया देताना गांगुली म्हणाले, “क्रिकेटमध्ये घडणारे परिवर्तन मी वेळोवेळी पाहिले आहे. त्यावेळी खेळाडूंच्या विविध प्रकारच्या मानसिकता होत्या. संघात प्रतिभेची कमतरता नाही हे मला पहिल्यापासूनच माहीत होते. मात्र, प्रतिभा तेव्हाच कामी येऊ शकते जेव्हा तिला दाखवण्याची संधी मिळते. माझ्या नेतृत्वाखाली अनेक महान खेळाडू खेळले जे कधीही कर्णधार होऊ शकले असते. त्या खेळाडूंना भेटण्याची संधी मिळाल्याने मी स्वतः ला भाग्यशाली समजतो.”
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
