Share

Shubhaman Gill | शुभमन गिलने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम

Published On: 

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेमधील न्युझीलँडने पहिला सामना आपल्या नावावर केला आहे. तरी या मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. दुसऱ्या सामन्यामध्ये नाणेफेक हरल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना 12.5 षटकांमध्ये एक गडी गमावून 89 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि पुढे एकही चेंडू टाकता आला नाही. अशा परिस्थितीत मैदान ओले असल्यामुळे आणि पावसामुळे बराच वेळ वाया गेल्याने हा सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या सामन्यात जय-पराजयाचा निर्णय झाला नसला, तरी या सामन्यांमध्ये भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubhaman Gill) याने आणखी एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

शुभमन गिल (Shubhaman Gill) ने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम

शुभमन गिल या सामन्यामध्ये 42 चेंडू 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 45 धावा काढल्या. ही खेळी खेळल्यानंतर गिलने सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चा विक्रम मोडला आहे. शुभमन गिल पहिल्या दहा डावांमध्ये भारतासाठी सर्वाधिक करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे सोडले आहे.

शुभमन गिलने आतापर्यंत भारतासाठी 14 एकदिवसीय सामने खेळले आहे. या 14 सामन्यांमध्ये 10 डावात गिलने सुरुवात केली आहे. शुभमन गिलने सलामीवीर म्हणून एक दिवसीय सामन्यांमध्ये 70.71 च्या सरासरीने 495 धावा केल्या आहेत. तर सचिन तेंडुलकरने सलामीवीर म्हणून भारतासाठी 10 सामन्यात 478 धावा केले आहे. सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडत शुभमन गिल पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर तिसऱ्या स्थानी राहुल द्रविड आहे. राहुल द्रविडने सलामवीर म्हणून 463 धावा केल्या आहेत. तर चौथ्या क्रमांकावर शिखर धवनने पहिल्या 10 डावात 432 धावा केले आहे. या यादीच्या पाचव्या क्रमांकावर वीरेंद्र सेहवागचे नाव आहे. त्याने पहिल्या 10 डावामध्ये 425 धावा केले आहे.

शुभमन गिलने झिम्बावेविरुद्धच्या मालिकेमध्ये सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडला होता. झिम्बावेमध्ये भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज शुभमन गिल ठरला आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या झिबाब्वेविरुद्धच्या सामन्यांमध्ये गिलने 130 धावांची इनिंग खेळली होती. त्याचबरोबर त्याने आपले पहिले वन-डे शतक पूर्ण केले होते. या खेळीनंतर त्याने सचिनचा विक्रम मोडला होता. यापूर्वी झिम्बावेच्या भूमीवर एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठा खेळी खेळणारा खेळाडू सचिन तेंडुलकर होता. पण या वर्षी झालेल्या या सामन्यानंतर हा विक्रम गिलने आपल्या नावावर केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!