Share

Sachin Tendulkar | ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथच्या निधनानंतर सचिन तेंडुलकर म्हणाला…

Published On: 

नवी दिल्ली : इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांंनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनांमुळे जगभर एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी सायंकाळी बालमोरल येथे राणीचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी त्यांना श्रद्धाजंली वाहिली आहे. यामध्ये राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. अशातच देशाचा मास्टर-ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनीही एलिजाबेथ राणी विषयी वक्तव्य केलं आहे.

सचिन तेंडुलकर याने नेमकं काय म्हटलं?

राणी एलिझाबेथच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. मला तिला अनेक प्रसंगी प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली आणि लोकांचे तिच्याबद्दलचे प्रेम आणि आदर पाहून मला आनंद झाला. तिच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांबद्दल माझ्या मनापासून संवेदना. असं त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात सचिन तेंडुलकर याने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं असून, त्यामध्ये सर्व लिहिलं आहे.

याचबरोबर राणीचे निधन झाल्याचे कळाल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राणीला आदरांजली वाहिली आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या फेसबुक आकाऊंटवर एक पोस्ट केली असल्याचं समजतं आहे.

दरम्यान, 19 फेब्रुवारी 2022 रोजी महाराणीला कोरोनाची लागण झाली होती. त्‍या डॉक्टरांच्या देखरेखीखाली होत्‍या. राजघराण्याने सांगितलं होतं की, राणीला ‘एपिसोडीक मोबिलीटी’ (episodic mobility) हा आजार झाला होता. यामध्ये रुग्णाला उभं रहायला व चालायला येत नाही. त्यामुळे राणी बालमोरल पॅलेसमध्ये राहत होती आणइ त्या ठिकाणाहूनच सर्व कार्यभार पाहत होती.तसेच, राणीला चार मुले आहेत. प्रिन्स चार्ल्स, राजकुमारी ऍनी, अँड्र्यू आणि एडवर्ड, ज्यांच्यापासून त्‍यांना आठ नातवंडे आणि 12 पणतू आहेत. आता राणीच्या निधानानंतर प्रिन्स चार्ल्स राजा बनले आहेत.

महत्वाच्या बातम्या  :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!