Share

“महिलांची कशी प्रतिमा तयार करताय? माफी मागा अन्यथा..” दिपाली सय्यद यांचा अमृता फडणवीसांना इशारा

Published On: 

मुंबई :  पुण्यामध्ये रेड लाईट भागात भाजपच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन केले गेले होते. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी अमृता फडणवीस यांनी याबाबत एक विधान केले होते. “वेश्या व्यवसायाचा प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा. जर्मनीमधे या व्यवसायाकडे आदराने पाहिले जाते. मी त्याच्या पाठीमागे आहे. वेश्या व्यवसायामुळे समाजातील संतुलन राखलं जात आहे. या व्यवसायामुळे बलात्कार कमी प्रमाणत होत आहेत.” अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री व शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्वीट करत भाष्य केले.

दीपाली सय्यद म्हणाल्या, “अमृता फडणवीस आपण समाज्यात महिलांची प्रतिमा कशी तयार करताय? दोन दिवसात माफी मागा अन्यथा महिला आयोगाच्या माझ्या तक्रारीला सामोरे जा.” दीपाली सय्यद यांनी अमृता फडणवीसांना थेट माफी मागा नाहीतर महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे आव्हान दिल्याने, नवा वाद होण्याची शक्यता आहे.

दरम्यान अमृता फडणवीस यांच्याकडून यावर काहीच प्रत्युत्तर न आल्याने आता दीपाली सय्यद त्यांची तक्रार महिला आयोगाकडे करतात का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर तक्रार दाखल करायला सय्यद यांच्याकडून प्रयत्न झाल्यास, यावर महिला आयोग काय भूमिका घेणार हे ही पाहेने महत्त्वपूर्ण आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!