Share

Cricket News | “रात्री 10 पेग प्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठोकले शतक” ; माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : 90 च्या दशकात खेळणारा आणि सचिन तेंडुलकर सोबत क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणारा माजी भारतीय खेळाडू विनोद कांबळी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. घर चालवण्यासाठी देखील त्याच्याकडे पैसे नाहीत, सध्या तो नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी स्वतः मुलाखतीत सांगितले आहे की तो नोकरीसाठी दारू सोडण्याच्या तयारीत आहे.

विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो भारतातील सर्वात तरुण आणि जगातील तिसरा सर्वात तरुण फलंदाज आहे. त्याने हा पराक्रम 1993 मध्ये इंग्लंडविरुद्ध केला होता, जेव्हा त्याचे वय अवघे 21 वर्षे 32 दिवस होते. कसोटी सामन्यांच्या 14 डावात सर्वात जलद 1000 धावा करणारा तो भारतातील सर्वात तरुण खेळाडू आहे.

या यादीत विनोद कांबळी तिसऱ्या क्रमांकावर –

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 1000 धावा करणाऱ्यांमध्ये इंग्लंडच्या हर्बर्ट सटक्लिफ आणि वेस्ट इंडिजच्या एव्हर्टन वीक्स यांचा देखील समावेश आहे. या दोघांनंतर, क्रिकेट महान डॉन ब्रॅडमन दुसऱ्या स्थानावर आहेत, ज्यांनी 13 कसोटी डावांमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठला. या यादीत विनोद कांबळी तिसऱ्या क्रमांकावर आहे. इतका मोठा विक्रम असूनही कांबळीची कारकीर्द केवळ 17 कसोटी सामन्यांपुरतीच टिकली.

एकदा रात्री 10 पेग दारू पिऊनही…-

या माजी डावखुऱ्या फलंदाजाने एकदा रात्री 10 पेग दारू पिऊनही दुसऱ्या दिवशी शतक केले होते. दरम्यान विनोद कांबळी दारू सोडण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयने दिलेल्या 30 हजारांच्या पेन्शनने तो मुंबईत आपले घर चालवत आहे. मात्र, कांबळीने नोकरीसाठी आपले वैभवशाली जीवन आणि दारू सोडल्याचे सांगितले आहे. त्याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी काम करायचे आहे. कोचिंगची जबाबदारी मिळाल्यास मी दारू सोडून देईन, असे तो म्हणाला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!