Share

Shubhaman Gill | फ्लॉप होऊनही शुभमन गिलने तोडला सचिन, सेहवाग आणि द्रविडचा ‘हा’ रेकॉर्ड

Published On: 

🕒 1 min read

क्राइस्टचर्च: आज क्राइस्टचर्च येथे भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) तीन एक दिवसीय सामन्यातील तिसरा आणि शेवटचा सामना खेळत आहे. या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकत न्यूझीलंड संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले असून संपूर्ण संघ 47.3 शतकांमध्ये 219 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारतीय संघाचे सलामीवीर कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) यांनी खेळीस संथ सुरुवात केली. या सामन्यातील 9 व्या षटकामध्ये वेगवान गोलंदाज ॲडम मिल्नेने शुभमन गिलला बाद केले. गिलने 22 चेंडूमध्ये 2 चौकार मारत 23 धावा केल्या.

या छोट्या खेळीनंतर शुभमन गिलने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. गिल एकदिवसीय फॉरमॅटमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वात जलद 500 धावा करणारा खेळाडू बनला आहे. 11 धावांमध्ये त्याने हा पराक्रम केला आहे. या बाबतीत गिलने राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Sing Siddhu) चे रेकॉर्ड तोडले आहे. द्रविड आणि सिद्धूने ओपनिंग करत असताना बारा सामन्यांमध्ये 500 धावा पूर्ण केल्या होत्या. तर हा आकडा गाठण्यासाठी शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि के ल राहुल (KL Rahul) ला 13-13 सामने खेळावे लागले होते.

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) यांनी ही धावसंख्या गाठण्यासाठी 14-14 सामने खेळले होते. गिलने पहिल्या वनडेत शानदार अर्धशतक झळकवले होते. या डावामध्ये त्याने 65 चेंडू मध्ये 50 धावा केल्या होत्या. तर, पावसामुळे रद्द झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये या सलामीवीराने 42 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या होत्या.

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन एक दिवसीय मालिकेच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यांमध्ये न्युझीलँड संघाच्या कर्णधार केन विल्यम्सनने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघ चांगली कामगिरी करू शकला नाही. यामध्ये भारतीय फलंदाज श्रेयश अय्यर्याने 49 तर वॉशिंग्टन सुंदर यांनी 51 धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!