Share

SL vs AUS : श्रीलंकाविरुद्ध पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर श्रीलंकेने या सामन्यात विजय मिळवला. मात्र ऑस्ट्रेलियाने ही ३ सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे. शेवटच्या सामन्यातबाबत बोलायचं झालं तर, सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने वर्चस्व गाजवले होते. पण शेवटच्या तीन षटकांमध्ये श्रीलंकेने सामना जिंकला. या पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच आपल्या संघाच्या कामगिरीवर समाधानी आहे. तो म्हणाला, “मला वाटते की आम्ही सामन्यात चांगला खेळ केला होता. मात्र श्रीलंका संघाचा कर्णधार शनाकाने आज एक अप्रतिम खेळी खेळली. आमच्या डावाच्या शेवटी खेळपट्टी थोडी मंदावली आहे असे आम्हाला वाटले. आधी किंवा नंतर फलंदाजी करून फारसा फरक जाणवला नाही. आम्ही आमच्या संघाच्या कामगिरीबद्दल समाधानी आहोत.”

मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १७७ धावांच्या लक्ष्याला उत्तर देताना श्रीलंकेची अवस्था खूपच बिकट होती. शेवटच्या तीन षटकांत त्यांना विजयासाठी ५९ धावांची गरज होती. श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने धडाकेबाज फलंदाजी करत एक चेंडू शिल्लक असताना संघाला विजय मिळवून दिला. श्रीलंकेने १८व्या षटकात २२ धावा, १९व्या षटकात १८ धावा आणि शेवटच्या षटकात १९ धावा केल्या.

मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा डाव १२८ धावांत गुंडाळला आणि प्रत्युत्तरात केवळ १४ षटकांतच लक्ष्याचा पाठलाग केला. या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार अॅरॉन फिंच या दोघांनीही अर्धशतके झळकावली होती. दुसरा सामनाही कमी धावसंख्येचा राहिला होता. दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ९ गड्यांच्या मोबदल्यात १२४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ देखील संघर्ष करताना दिसला होता. परंतु ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने दमदार खेळी करत १३ चेंडू राखून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. वॉर्नरने या मालिकेत सर्वाधिक १३० धावा केल्या. तर जोश हेझलवूडने सर्वाधिक ६ बळी मिळवले.

तिसऱ्या टी-२० सामन्यातील दमदार खेळी साठी श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याला ‘मॅन ऑफ द मॅच’ देण्यात आली. तर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार अॅरॉन फिंचला ‘प्लेयर ऑफ द सिरीज’ म्हणून घोषित करण्यात आले. तिसर्‍या आणि शेवटच्या सामन्यात श्रीलंका संघाने ऑस्ट्रेलियावर मोठा विजय मिळवल्याने पुढील क्रिकेटसाठी या संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला असणार आहे. श्रीलंकेतील आर्थिक वातावरण स्थिर नसल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात मालिकेअगोदर शंका होत्या. मात्र ही मालिका अत्यंत सुरक्षित आणि चांगल्या वातावरणात पार पडल्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी आता मोकळा श्वास सोडला आहे. कारण पुढील काळात श्रीलंका येथे ‘एशिया कप’ स्पर्धा खेळली जाणार आहे. परंतु या स्पर्धेच्या आयोजनाबाबत अजूनही कोणताही अधिकृत निर्णय घेतला गेलेला नाही.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!