🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघाला २०११चा (World Cup 2011) विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन (Gary Kirsten)हे इंग्लंड कसोटी संघाचे पुढील प्रशिक्षक होऊ शकतात. खरे तर इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे नवे संचालक रॉब वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे प्रशिक्षक बनवण्याच्या विचारात आहेत. त्यामुळेच गॅरी कर्स्टन इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक होण्याची शक्यता बळावली आहे. कर्स्टन यांनाही फक्त एकाच फॉरमॅटचे प्रशिक्षण करायचे आहे.
याआधी ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लँगर या शर्यतीत होते पण नव्या अपडेट नुसार त्यांच्या नावाचा विचार न करता त्यांच्या जागी सायमन कॅटिचला संधी मिळण्याची शक्यता आहे. ख्रिस सिल्व्हरवुड यांच्या राजीनाम्यानंतर इंग्लंड संघ नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी पॉल कॉलिंगवूड यांची संघाचे हंगामी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गॅरी कस्टर्न यांनी सांगितले होते, की जर त्यांना एका फॉरमॅटसाठी प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली तरच ते या भूमिकेचा विचार करू शकतील .
EXCLUSIVE: Gary Kirsten approached to be new England Test coach after reservations about Justin Langer | @NHoultCricket https://t.co/soqOsAr1tB
— Telegraph Cricket (@TeleCricket) April 24, 2022
Gary Kirsten is likely to be shortlisted for the coaching role of the England Test team. (Source – The Guardian)
— Johns. (@CricCrazyJohns) April 25, 2022
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गॅरी कर्स्टन म्हणाले होते, “इंग्लंडचे प्रशिक्षक बनणे हा एक मोठा सन्मान आहे. म्हणूनच मला नेहमीच त्यांचे प्रशिक्षक बनायचे होते. जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षकांचा विचार करतील, तेव्हाच मी त्यावर लक्ष केंद्रित करेन.”
याआधी दिग्गज फलंदाज मार्क बाऊचरने सर्व फॉरमॅटमध्ये एकच मुख्य प्रशिक्षक नियुक्त केला पाहिजे, असे म्हटले होते. त्यांनी व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांना सर्व फॉरमॅटमध्ये एकाच मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यास सांगितले होते. याशिवाय त्यांनी राष्ट्रीय निवडकर्त्यांची भूमिका बहाल करण्याची मागणीही केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
