मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्यांनी केली होती. या घोषणेसह राणा दाम्पत्यांनी वाद निर्माण होईल अशी दोन वक्तव्ये केली होती. यावरून राजद्रोहाच्या कलमासह अन्य कलमांखाली खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या राणा दाम्पत्याने मुंबई हायकोर्टात धाव घेतली. एफआयआर रद्द करण्याच्या विनंतीची फौजदारी रीतसर याचिका केल्यानंतर त्यावर हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.
राणा दाम्पत्यांच्या वकिलांनी त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर विनंती केली की, “ न्यायालयात दंडाअधिकाऱ्यांच्या समोर ज्यावेळी त्यांच्या जामीनाच्या अर्जावर सुनावणी होईल, त्यावेळीला इथे जी त्यांच्या विरोधात निरीक्षण झाली आहेत. ती माननीय न्यायालयाने जामीना अर्जात विचार करताना विचारात घेऊ नये”.
राणा दाम्पत्याच्या अटकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया –
राणा दाम्पत्याला काल वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयानं दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राणा दाम्पत्य आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली. “तुम्ही ‘मातोश्री’ वर हल्ला करण्याचे नियोजन करता मग आम्ही काय बघत बसायचं का? हल्ला करण्याचं नियोजन करता आले नाही, शिवसैनिकांनी डाव हाणून पाडला ती गोष्ट वेगळी. पण अशा प्रकारचे धंदे तुम्ही करणार असाल तर शिवसैनिक शांत बसणार नाही. तसेच प्रत्येक शिवसैनिक बर्हिजी नाईक आहे. त्यामुळे मातोश्रीवर घुसणं इतकं काही सोपं काम नाही”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

