मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३ मे हा शेवटचा दिवस होता. काल शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार होते. मात्र, कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे याचा कोणत्या पक्षाला फायदा होतो आणि कुणाला धक्का बसतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र अशातच वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केले आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन चर्चांना उधाण आले आहे. “सहावा उमदेवार शिवसेनेचा आणि भाजपचा देखील आहे. भाजपचे सहावे उमेदवार हे राष्ट्रवादीचे यापूर्वीचे खासदार होते. साखर कारखानदारी आणि सहकाराचा त्यांना अभ्यास आहे. त्यामुळे भाजपचा राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील गडाला भगदाड पाडण्यासाठी कसोटीने प्रयत्न चालू आहे. धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीमुळे आता भाजपा-शिवसेनेतील ही लढत राष्ट्रवादी विरूद्ध भाजपा झाली आहे”, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
दरम्यान, “राष्ट्रवादीला स्वत:चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार संजय पवार यांना निवडून आणावा लागेल. तो उमेदवार निवडून न आल्यास भाजपने राष्ट्रवादीच्या गडात प्रवेश केला असे म्हटले जाईल. राष्ट्रवादीला पूर्णपणे आव्हान देणे भाजपला सोपे जाईल, केंद्राच्या हातात इथेनॉलचे लायसन्स आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या साखर कारखानदारांना इथेनॉलचं लालूच दाखवून ते त्यांना भाजपाकडे घेतील आणि राष्ट्रवादीला खिंडार पडू शकते”, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

