Share

“भाजपकडून आमदार फोडण्याचे काम सुरू”; संजय राऊतांचा आरोप

Published On: 

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपकडून विजयाचे दावे–प्रतिदावे सुरु झाले असल्याचे पाहायला मिळत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमचे निवडणूक जिंकण्याचे गणित पक्के झाले आहे असा दावा केला आहे, तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील भाजपने आमदार फोडण्याचे काम सुरू केले असल्याचा आरोप केला आहे.

चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “आम्हाला आमदारांना कुठे बंदिस्त करण्याची गरज नाही. आमचा त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीवर विश्वास आहे. आमदारांवर आम्ही कशाला दबाव आणू. आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेऊन आमदार फोडण्याचे काम करीत आहोत, असे संजय राऊत म्हणतात. ते त्यांनी सिद्ध करावे. वाटेल ती चौकशीही करा”.

संजय राऊत म्हणाले, “आम्ही उमेदवार मागे घेणार आहोत, अशा चर्चा कुठून सुरू झाल्या, याचे सूत्रधार कोण आहेत, आम्हाला माहीत आहे. केंद्रात तुमचे सरकार आहे, तसे राज्यात आमचे सरकार आहे. मुख्यमंत्री, आमदार आणि आमचा चांगला समन्वय आहे. राजकीय पक्षाच्या आमदारांना मत दाखवायचे असते. बाकी लढाई अपक्ष आणि छोट्या पक्षांशी आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांची विकासकामे केली आहेत. हे सर्व आमदार महाविकास आघाडीसोबत जोडले गेले आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.

महत्वाच्या बातम्या –

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!