Share

देशात पुन्हा कोरोनाचा वेग वाढला; केंद्राने 5 राज्यांना दिला ‘हा’ सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : तब्बल 84 दिवसांनंतर शुक्रवारी (३ जून) रोजी देशभरात कोरोनाव्हायरस संसर्गाची 4 हजारांहून अधिक रुग्णांची  नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क झाले असून, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडूसह पाच राज्यांच्या अधिकाऱ्यांना कोरोना संसर्गाबाबत पत्र लिहिले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पत्र लिहिले. या पत्रात राज्यांतील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, पुणे, रायगड या सहा जिल्ह्यांमध्य़े कोरोना चाचण्या, लसीकरण वाढवण्यावर भर देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही केंद्राने दिला आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे आणि संसर्ग झालेल्या लोकांच्या गटावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आणि पुरेशा संख्येत कोरोना संसर्गाची तपासणी करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबरोबरच मुंबईतही कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळेच टास्क फोर्स पुन्हा एकदा कार्यरत झालेय. टाक्स फोर्सचे सदस्य राहुल पंडित यांनी कोरोनाला रोखण्यासाठी काही सल्ले दिले आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. मुंबईत दररोज सातशेच्यावर रुग्ण सापडतात. यातील गंभीर रुग्णांची संख्या लक्षात घेत त्यानुसार उपचार केले जावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!