Share

Ajit Pawar | “महाविकास आघाडी समविचारी पक्षांना सोबत घेण्यास तयार”, अजित पवार स्पष्ट बोलले

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | मुंबई : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर शिवशक्ती आणि भिमशक्तीच्या युतीच्या चर्चांना हवा मिळाली. वंचित मविआमध्ये सामील होणार असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची भूमिका काय असेल, याबाबत तर्क लावले जात आहेत. अशातच राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे.

काल अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांना विचारलं सर्वांची सकारात्मक भूमिका आहे. समविचारी पक्षांनी एकत्र लढलं पाहिजे. वंचित मविआसोबत येत असेल तर आम्हाला आनंदच आहे, महाविकास आघाडी समविचारी पक्षांना सोबत घेण्यास तयार आहे, असं अजित पवार म्हणाले.

तक्रार काय करता त्यांचे आरे ला कारे ने उत्तर द्या. त्यांना महाराष्ट्राची भूमिका दाखवा. कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्याप्रकारे वक्तव्य करत आहेत. त्यांना जशास तसे उत्तर देण्याचे काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केले पाहीजे. महाराष्ट्रात असलेला सत्ताधारी पक्षच कर्नाटकमध्ये राज करत आहे. भाजपचे मुख्यमंत्री कर्नाटकमध्ये आहेत आणि इथ भाजपचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यांनी योग्य रस्ता काढावा, असं देखील सीमा वादावर पवार म्हणाले.

महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, आमच्या दोन मंत्र्यांच्या बेळगावी भेटीबाबत आम्ही कर्नाटक सरकारला अधिकृतपणे कळवले आहे. देसाई म्हणाले की, आम्ही यात्रा पुढे ढकलली आहे, रद्द केलेली नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!