Share

‘फडणवीस जेव्हा पवारांवर टीका करतात, तेव्हाच चमत्कार घडतो, 2024 लाही घडेल’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त रविवारी मुंबईत पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार पंतप्रधान व्हावे असे सूर त्या कार्यक्रमामध्ये उमटले होते. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली. देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

स्वप्न पाहणे हे काही वाईट नाही. शरद पवार हे त्यांच्या पक्षाच्या जन्मापासून ते स्वप्न पाहत आहेत. पण त्यांचा पक्षाचे 10 चा आकडाही पार करु शकला नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यावरुन नवाब मलिकांनी देखील देवेंद्र फडणवीसांना खडेबोल सुनावले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या आधी फडणवीसांनी सांगितले होते की, पवारसाहेबांचे राजकारण संपलेले आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस टीका करतात तेव्हाच चमत्कार घडतात. 2024 ला आम्ही चमत्कार घडवून आणू, असे नवाब मलिक म्हणाले आहेत. ‘फक्त शरद पवारच विरोधकांना एकत्र आणतील आणि विरोधकांच्या एकजुटीमुळे मोदी सरकार सत्तेतून बाहेर जाईल’, असेही नवाब मलिक म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवार यांनी देशाचे नेतृत्व करावे. जर गुजरातमध्ये 26 खासदार असताना एक व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकते. मग 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातून शरद पवारही पंतप्रधान होऊ शकतात, असे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे कार्यक्रमामध्ये म्हणाले आहेत. अमोल कोल्हेंच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!