Share

शरद पवार पक्ष स्थापनेपासून पंतप्रधान पदाची स्वप्न बघत आहेत- देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त रविवारी मुंबईत पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे असा सूर उमटल्याचे पाहायला मिळाले.

शरद पवार यांनी देशाचे नेतृत्व करावे. जर गुजरातमध्ये 26 खासदार असताना एक व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकते. मग 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातून शरद पवारही पंतप्रधान होऊ शकतात, असे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे कार्यक्रमामध्ये म्हणाले आहेत. अमोल कोल्हेंच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर शरद पवारांना खोचकपणे वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

देवेंद्र फडणवीसांना अमोल कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या पंतप्रधानपदाबाबतच्या मुद्दावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी फडणवीसांनी ‘माझ्या पवारांना खूप शुभेच्छा आहेत. स्वप्न पाहणे हे काही वाईट नाही. त्यांच्या पक्षाच्या जन्मापासून ते स्वप्न पाहत आहेत. पण त्यांचा पक्षाचे 10 चा आकडाही पार करु शकला नाही. त्यामुळे मला वाटतं की ठीक आहे. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!