🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांचा आज ८१ वा वाढदिवस. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्यासोबतच आज देशातील विविध राजकीय पक्षातील नेत्यांनीही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनेक नेते मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच शरद पवार यांच्या बद्दलचे काही किस्से व आठवणींना देखील उजाळा दिला आहे. दर वर्षी पवारांच्या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम देखील राबवले जातात. शनिवारी पत्रकार सुधीर भोंगळे यांनी पवारांच्या काही मोजक्या भाषणांचा संग्रह असलेले ‘नेमकचि बोलणे’ हे पुस्तक देखील प्रकाशित करण्यात आले.
वाढदिवसाच्या सोहळ्यात अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. अनेकांनी शरद पवारांना भरभरून शुभेच्छा दिल्या. या वेळी राष्ट्रवादीचे नेते व खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी देखील शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. अमोल कोल्हे म्हणाले, या देशाला शरद पवारांच्या मार्गदर्शनाची गरज आहे तसेच जर २६ खासदार असलेला गुजरात मधील व्यक्ति पंतप्रधान पदी बसू शकते, तर मग ४८ खासदार असलेला महाराष्ट्रातला महाराजांचा मावळा हा त्या सर्वोच्च स्थानी विराजमान का होणार नाही, हा विचार आम्ही प्रत्येकनी करणं गरजेचं आहे आणि ज्या दिवशी हे स्वप्न पूर्ण होईल त्या दिवशी खात्रीने सांगतो संसदेतल्या प्रांगणातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या मराठी मातीतल्या सुपुत्राला त्या स्थानी बसल्यानंतर हसताना बसेल, असं यावेळी अमोल कोल्हे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी औरंगाबादेत पहिली ‘जन सुनवाई’; लोकप्रतिनिधींची पाठ!
- कोहली कर्णधारपदावरून हटताच अश्विनचे चांगले दिवस; रोहितने सांगितली मोठी गोष्ट
- जिल्हानिहाय इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती करा; पालकमंत्र्यांच्या सूचना
- शिवसेनेच्या बॅनरबाजीवरून नितेश राणे आक्रमक;म्हणाले,’शिवसेना हा नाच्यांचा…’
- शेन वॉर्नच्या मते स्टीव्ह स्मिथ कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम फलंदाज तर कोहली…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
