Share

‘सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम फक्त शरद पवारच करु शकतात’

Published On: 

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सध्या दिल्लीमध्ये आहेत. आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर भाष्य केले. त्याचबरोबर महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणार का? यावरही संजय राऊतांनी भाष्य केले आहे.

यावर बोलण्यासाठी थोडा वेळ लागेल. सर्वांसोबत चर्चा सुरु आहेत. इतक्या घाईघाईने मी काही सांगू शकत नाही. सर्वच पक्षांबरोबर नेहमीच चर्चा सुरु आहे. पण समोरच्या पक्षाकडून प्रस्ताव आला तर त्यावर पक्ष विस्ताराने चर्चा करेल. ज्या राज्यात आम्हाला एकत्र यायचे आहे तिथल्या लोकांसोबत चर्चा केली जाते. आतापर्यंत ही चर्चा झालेली नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

गोव्यातही अशी आघाडी झाली तर त्याचे स्वागत आहे. नाही झाली तर आम्ही स्वबळावर लढू. आम्ही गोव्यात 22 जागांवर निवडणूक लढणार आहे. आम्ही या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना ज्या पद्धतीने काम करत आहे आम्ही त्याच पद्धतीने गोव्यात काम करु. शिवसेना आणि गोव्याचं भावनिक नातं आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

देशात विरोधकांची एकता होण्याची गरज आहे. मी राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करत असतो. सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम फक्त शरद पवार करु शकतात. विरोधकांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी गुन्हा दाखल केला असावा. मी देशाच्या हितासाठी बोलत राहणार. संसदीय लोकशाहीत विरोधक महत्वाचे असतात, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!