🕒 1 min read
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसाठी (Sharad Pawar) खुर्ची उचलून आणतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवरुन प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राऊतांनी भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्दांचा वापर केला होता. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत (Dipti Rawat) यांनी दिल्लीमध्ये संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणीही दीप्ती रावत यांनी केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी ज्या शब्दाचा वापर केला त्याचा अर्थ मुर्ख आणि बुद्धू असा आहे. सरकार आणि मान्यताप्राप्त शब्दकोषांमध्ये त्या शब्दाचा अर्थ आहे. मोठ्या साहित्यिकांनी त्याचा अर्थ सांगितला आहे. माझ्या विरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालय दिल्ली पोलिसांचे नेतृत्त्व करते. हा गुन्हा बदल्याच्या आणि राजकीय बदल्याच्या भावनेतून दाखल करण्यात आला आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
FIR registered against me in Delhi has been done with political motives & to suppress my voice. It has been done to defame my party as CBI, I-T, ED can't be used against me. I'm an MP, it's not right to encourage some to register false complaints against me: Sanjay Raut, ShivSena pic.twitter.com/eNR3bf5Egb
— ANI (@ANI) December 13, 2021
सीबीआय (CBI), ईडी (ED), इनकम टॅक्स (Income Tax) माझ्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. मात्र, या मार्गाने माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. महाराष्ट्रात तुम्ही काही करु शकत नाही. यंत्रणा माझ्या विरोधात बोलू शकत नाहीत. हे अशा प्रकारचे हातखंडे वापरून आमच्या विरोधात एफआयर दाखल केली जाते. मी त्यांना सांगू इच्छितो की ही शिवसेना आहे त्यांनी लक्षात ठेवावं, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, सध्या संसदेचे सत्र सुरु आहे. माझ्यावर एफआयर दाखल करुन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही संजय राऊत दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार पक्ष स्थापनेपासून पंतप्रधान पदाची स्वप्न बघत आहेत- देवेंद्र फडणवीस
- सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाला सांगितला राऊतांनी उच्चारलेल्या ‘त्या’ शब्दाचा अर्थ
- भाजप कार्यकर्त्यांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून; राऊतांविरोधात दिल्लीत तक्रार दाखल
- ‘…ही संकटाची चाहूल तर नाही ना , याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावेच लागेल’
- म्हाडा पेपरफुटीची सीबीआय चौकशी करा; फडणवीसांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
