नवी-दिल्ली : काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसाठी(Sharad Pawar) खूर्ची उचलून आणतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. तद्पश्चात या फोटोवरुन प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राऊतांनी भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्दांचा वापर केला होता. त्यानंतर आता भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी दिल्लीमध्ये राऊतांविरोधात तक्रार दाखल केली असून संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणीही दीप्ती रावत यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाला संजय राऊत यांनी उच्चारलेल्या ‘चूतिया’या शब्दाचा अर्थ सांगितला आहे.
ट्विटमध्ये सावंत म्हणाले आहेत की ,’आश्चर्य आहे! संजय राऊत यांच्यावर भाजपा महिलांनी गुन्हा दाखल केला, का तर त्यांनी एक शब्द वापरला. जरी सदर शब्दाचा वापर मी करत नाही तरी अज्ञानी भाजपाच्या प्रबोधनासाठी मराठी लेखक व शब्दकोशकार कै.श्रीपाद जोशी यांच्या १९५७ पासून प्रकाशित अभिनव शब्दकोशातील तोच शब्द व अर्थ देत आहे.’
आश्चर्य आहे! @rautsanjay61 यांच्यावर #भाजपा महिलांनी गुन्हा दाखल केला का तर त्यांनी एक शब्द वापरला! जरी सदर शब्दाचा वापर मी करत नाही तरी अज्ञानी भाजपाच्या प्रबोधनासाठी मराठी लेखक व शब्दकोशकार कै.श्रीपाद जोशी यांच्या १९५७ पासून प्रकाशित अभिनव शब्दकोशातील तोच शब्द व अर्थ देत आहे. pic.twitter.com/18s8Z7ZV06
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 12, 2021
दरम्यान, राज्यसभेतील निलंबीत खासदारांचे संसदेसमोर धरणे आंदोलन सुरु असतांना या आंदोलनाला ७ डिसें.रोजी शरद पवारांनी भेट दिली. यावेळी संजय राऊत शरद पवारांसाठी खूर्ची उचलून आणतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर या फोटोवरुन विरोधकांकडून टीकास्त्रांचा वर्षाव होत असतांनाच राऊतांनी याविषयी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आमचे गुरू आहेत. त्यांनीच मला हा संस्कार दिला आहे. यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. ही चुXXगिरी बंद करा. अशाने तुमचं महाराष्ट्रात कधीच राज्य येणार नाही. ही विकृती आहे. तुमच्या डोक्यातील हा कचरा तुम्ही साफ केला नाही, तर एखाद्या डंपिंगमध्ये लोकं तुम्हाला गाडून टाकतील,हे तुम्हाला मी आता सांगतो. पवारांसारख्या उंचीचे लोकं देशात आहे. त्यांना खुर्ची देणं यात काही वावगं नाही. हे तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला फुले-आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असे राऊत म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…ही संकटाची चाहूल तर नाही ना , याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावेच लागेल’
- भाजप कार्यकर्त्यांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून; राऊतांविरोधात दिल्लीत तक्रार दाखल
- जितेंद्र आव्हाडांचा विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न; केली महत्वाची घोषणा
- ‘आव्हाडसाहेब, जमत नसेल तर मंत्रिपद सोडा, कुंपणच शेत खात असेल तर….’
- गरिबातल्या गरीब फाटक्यातल्या फाटक्या माणसापर्यंत गोपीनाथ गड पोहोचवण्याचा संकल्प! पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन


