Share

‘आज देशाला बाबासाहेब यांच्यासारख्या नागरिकाची आवश्यकता’

Published On: 

पुणे : पुण्यात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता. सिम्बॉयसिस संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उपस्थित होते.

आजचा दिवस भारताच्या इतिहासात खूप महत्वाचा दिवस आहे. आपल्या देशात बाबासाहेब जन्माला आले याचा आम्हाला अभिमान वाटतो. बाबासाहेब यांचं कौतुक करायला माझ्या जवळचे मराठीतले शब्द कमी पडतील. आज देशाला बाबासाहेब यांच्या सारख्या नागरिकाची आवश्यकता आहे. आज आपल्या देशातून जात, धर्म आणि भेद मिटवायचे असेल तर बाबासाहेबांची विचारसरणी गरजेची आहे, असे नारायण राणे म्हणाले आहेत.

कर्तव्याची जाणीव करून देणारा आजचा दिवस आहे. भारतीय नागरिकांनी देशासाठी आणि समाजासाठी कसे काम केले पाहिजे याची प्रेरणा देणारा आजचा दिवस आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणते विशेषण वापरावे हा प्रश्न पडतो. बाबासाहेब हुशार, बुद्धीमान आणि कर्तव्यनिष्ठ होते. आज या महाविद्यालयातून बाहेर जाणारी विचारसरणी आत्मनिर्भर भारताची असणार आहे. भारत माझा देश आहे, असं म्हणणारे नागरिक भारतात असावे. त्यांना परमपुज्य बाबासाहेब आंबेडकरांचे नाव सांगताना गर्व वाटायला पाहिजे, असेही नारायण राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!