Share

नवाब मलिकांचा टोला; म्हणाले समीर वानखेडे चैत्यभूमीवर पहिल्यांदा दिसले, नमाजाला मात्र…

Published On: 

मुंबई: ड्रग्स प्रकरण झालं तेव्हा पासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या मागे हात धुवून लागले असल्याचे दिसत आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या जातीच्या मुद्द्यावरून नवाब मलिक यांनी आरोप केले आहेत. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त समीर वानखेडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले. मात्र भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं वानखेडेंच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदवला. समीर वानखेडेंना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही अशी भूमिका भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक हे तिथे दाखल झाले आणि पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले की, बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा अधिकार प्रत्येकाचाच आहे. तो कोणत्याही धर्माचा असो वा जातीचा. काही लोकांनी नव्यानं इथे येण्यास सुरुवात केली हे चांगलंच आहे. समीर वानखेडे हे कधी चैत्यभूमीवर इतक्या वर्षात अभिवादनाकरता आले का नाही हे मला माहित नाही पण, ते माझ्यासोबत नमाज पढायला नियमितपणे यायचे हे माहिती आहे, असं म्हणत नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!