नवी-दिल्ली : शनिवारी नागालॅण्डमधील मोन जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये सहा खाण मजुरांसह १४ नागरिक ठार झाले, तर ११ हून जास्त जखमी झाले. त्यानंतर उसळलेल्या दंगलीत एका जवानाचा मृत्यू झाला. दरम्यान, दिल्लीमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना या घटनेप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे.
यासंदर्भात बोलत असतांना राऊत म्हणाले की,’आपल्याकडे अनेकांना देशद्रोही ठरवून तुरुंगात डांबले जाते. फक्त गोळ्या घातल्या जात नाही इतकंच. आमच्या मागेसुद्धा सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावत छळ केला जातोच. फक्त त्यांच्या हातात बंदुका नाहीत, वेगळ्या प्रकारे छळ केला जातो. अशाप्रकारे राज्य करण्याची ही प्रवृत्ती आणि विकृती वाढत चालली आहे”.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’आज मल्लिकार्जून खरगे(Mallikarjun Kharge) यांच्या दालनात बैठक असून पुढील आठवड्यात रणनिती काय असेल यासंबंधी निर्णय होईल. तसेच मागील अधिवेशनातील शिक्षा तेव्हाच दिली पाहिजे. तीन महिन्यांनी अशाप्रकारे शिक्षा देणं कोणत्या नियमात बसतं हे समजून सांगणं गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या- संजय राऊत
- चिंताजनक! राज्यात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ८ वर
- येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळवणार- गुलाबराव पाटील
- ५० टक्के लसीकरण कोविडविरोधातील महत्वाचा टप्पा, मात्र ही गती कायम ठेवणे आवश्यक- नरेंद्र मोदी
- ‘ओमायक्रॉन’संबंधी केंद्र सरकारने कडक भूमिका घ्यायला हवी- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

