Share

अमृता सिंहला लेक सारासोबत काम करायचं नाही? ; जाणून घ्या कारण

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. सारा अली खान आणि तिची आई अमृता सिंह (Amrita Singh) या दोघीही काही दिवसांपूर्वी एकत्र एका जाहिरातीत झळकल्या होत्या. मात्र अद्याप माय-लेकीच्या या जोडीने चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. नुकतंच एका मुलाखतीत तिने आई अमृता सिंहसोबत काम करण्याबाबतचा खुलासा केला.

दरम्यान साराने नुकतंच एक मुलाखतीत सांगितले की, ‘माझ्या आईला माझ्यासोबत काम करणे आवडणार नाही, कारण ती माझी ‘आई’ आहे. मला ‘माझ्या आईसोबत काम करण्याची प्रचंड इच्छा आहे. मात्र माझी ही इच्छा क्वचितच पूर्ण होईल, असे मला वाटते. माझ्या मते आईला माझ्यासोबत काम करणे अजिबात आवडणार नाही.’ असे साराने तुला आईसोबत चित्रपटात काम करायला आवडेल का? या प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केले. तसेच ‘जर एखादा चित्रपट आम्ही केला, त्याचे शूटींग सुरु असेल आणि त्याचदरम्यान माझ्या चेहऱ्यावर केस आले तर ती मध्येच कट म्हणेल. त्यानंतर माझे केस व्यवस्थित करेल. मी सर्वोत्तम दिसावे, अशी तिची स्वाभाविक इच्छा असू शकते. त्यामुळे मला कधीही असं वाटतं नाही की मी तिला अशा परिस्थितीत टाकावे.’ असा खुलासा केला.

https://www.instagram.com/p/CP2VztUpQih/?utm_source=ig_web_copy_link

तसेच ‘आईच्या मते तुम्ही तुमच्या कामात १०० टक्के द्या. त्यामुळे तुम्हाला हवे ते परत मिळेल. ती आजही फार उत्साहाने कामावर जाते आणि कामावरुन परतत असतानाही ती तेवढीच उत्साहित असते.’ असे ही साराने सांगितले. दरम्यान अमृता आणि सैफची ( Saif Ali Khan ) ‘बेखुदी’ चित्रपटाच्या सेटवर ओळख झाली होती. या चित्रपटातून सैफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होता. अमृता आणि सैफने घरातील लोकांच्या विरोधात जाऊन १९९१ मध्ये लग्न केले होते. मात्र २००४ मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!