मुंबई : न्यूझीलंडचा कसोटी मालिकेत 1-0 असा पराभव केल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हा कसोटी सामना जिंकून खूप चांगले वाटले, असे राहुल द्रविड (Rahul Dravid) ने म्हटले आहे. कानपूरमध्ये आम्ही जवळ येऊन विजयापासून दूर राहिलो पण यावेळी कोणतीही चूक केली नाही.
मुंबई कसोटीत भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केला. मुंबईत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव करून मोठा विक्रम केला. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना किवीज दुसऱ्या डावात अवघ्या 167 धावांत गारद झाले आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अशाप्रकारे भारतीय संघाने ही मालिका १-० ने जिंकली.
भारताच्या जबरदस्त विजयानंतर राहुल द्रविडने मोठी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘कसोटी मालिका विजयाच्या जोरावर संपवणे खूप छान होते. कानपूरमध्ये आम्ही खूप जवळ आलो पण त्यांना एकही विकेट घेता आली नाही. या विजयाचे श्रेय संपूर्ण संघाला जाते. कानपूरचा सामना अनिर्णित राहिल्याने सर्वांचीच निराशा झाली, मात्र या सामन्यात खेळाडूंनी संधीचा पुरेपूर फायदा उठवला. काही वरिष्ठ खेळाडू संघात नव्हते पण त्यांच्या अनुपस्थितीत तरुण खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.
विजयासाठी 540 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 56.3 षटकात अवघ्या 167 धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात 325 धावा केल्या होत्या, याला प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ अवघ्या 67 धावांवर आटोपला. भारताने दुसरा डाव २७६/७ धावांवर घोषित केला.
महत्वाच्या बातम्या
- भारताचा विजय! न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने कसोटीसह जिंकली मालिका
- चिंताजनक! राज्यात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ८ वर
- ‘भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या लेखण्या म्हणजे शेळ्या-मेंढ्यांच्या शेपटा’
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आजपासून भारत दौऱ्यावर
- येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळवणार- गुलाबराव पाटील


